Download App

IND vs AUS 3rd Test: फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकले, भारत पराभवाच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली : इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या (IND vs AUS) दुसऱ्या दिवशी कांगारूने भारतीय फलंदाजांना नांग्या टाकण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज टिकू शकले नाही व टीम इंडिया दुसऱ्या डावात अवघ्या 163 धावांवर गारद झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला आता विजयासाठी अवघ्या 76 धावा आवश्यक आहे. यामुळे उद्याच्या दिवसात काय होणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 109 धावांत आटपला गेला. त्यानंतरऑस्ट्रेलिया संघाने आपल्या पहिल्या डावात 197 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने 88 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही भारताची सुरुवात चांगली झाली नाही. खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या लोकेश राहुलच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला शुभमन गिल (05) धावा केल्या व बाद झाला.

त्यानंतर लियोनने भारतीय कर्णधार रोहित शर्माला (12) लेग बिफोर पायचीत केले, डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमनला चौकार मारल्यानंतर पुढचा चेंडू खूप मागे खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली (13) बाद झाला. रवींद्र जडेजा (07) देखील एलबीडब्ल्यू झाला. या सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजाराने फिरकीपटूंविरुद्ध बॅकफूटवर काही चांगले शॉट्स खेळले.

चेतेश्वर पुजाराने संघाचा डाव सांभाळला आणि दमदार अर्धशतक झळकावले. चेतेश्वर पुजाराने 142 चेंडूत 59 धावांची खेळी केली. तर या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून नॅथन लायनने 8 बळी घेत भारतीय संघाला दुसऱ्या डावात 163 धावांत गारद केले. यासह कांगारू संघाला तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी अवघ्या 76 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले आहे.

नॅथन लायनने 8 विकेट घेतल्या
इंदूरच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकी गोलंदाज लायन अप्रतिम कामगिरी करताना दिसला. दुसऱ्या डावात त्याने प्रथम भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला 12 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर लिओनने अवघ्या 5 धावांच्या जोरावर शुभमन गिलला आऊट केले. याशिवाय लायनने रवींद्र जडेजा, केएस भरत, आर अश्विन, उमेश यादव, चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद सिराज यांना बाद केले.

Tags

follow us