IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (IND vs AUS) पहिलाच सामना टीम इंडियाने जिंकत आघाडी घेतली. घरच्या मैदानावर टीम इंडिया शेरच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाला असला तरी त्याचा फटका मात्र पाकिस्तानला संघाला बसला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिला सामना पंजाबमधील मोहाली येथील मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फायद्याचा ठरला.
Ind Vs Aus : पहिल्याच सामन्यात भारताचा 5 गडी राखून दणदणीत विजय…
भारताचा धडाकेबाज गोलंदाज शमी याही सामन्यात चमकला. शमीन ऑस्ट्रेलियाच्या संघाला हादरे देत 5 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर भारताने सामना जिंकला. या विजयाचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला तर पाकिस्तान संघाला फटका बसला. या विजयासह भारतीय संघाने तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर एक असण्याचा बहुमान मिळवला. आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे पाकिस्तानला मोठा फटका बसला. या सामन्याआधी पाकिस्तानचा संघ पहिल्या नंबरवर होता. मात्र, आता हा संघ दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा असा फटका पाकिस्तान संघाला बसला आहे. यानंतर पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी पाकिस्तान संघाला मोठी मेहनत घ्यावी लागेल. सध्या भारताचा संघ लयीत दिसत आहे. संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतरही संघाने जबरदस्त खेळ करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
World Cup 2023 : पाकिस्तानचा संघ ठरला; कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या…
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सर्व 10 गडी गमावून 276 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 52, जोश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावा केल्या. भारताकडून शमीने पाच विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या. ऋतुराजने ७१ धावांची तर शुभमन गिलने ७४ धावांची खेळी केली. तर, सूर्यकुमार यादव 50 धावा करून बाद झाला. कर्णधार केएल राहुलने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. राहुलने 49 व्या षटकात शॉन अॅबॉटला षटकार ठोकून या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारतीय संघाची विजयी वाटचाल सुरू झाली आहे.
No. 1 Test team ☑️
No. 1 ODI team ☑️
No. 1 T20I team ☑️#TeamIndia reigns supreme across all formats 👏👏 pic.twitter.com/rB5rUqK8iH— BCCI (@BCCI) September 22, 2023