बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ( Boarder- Gavaskar Trophy ) ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाला नागपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आता दुसरा सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार एलेन बॉर्डर ( Elon Border ) याने प्लेइंग इलेवन निवडली आहे. या संघात त्याने पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या टॉड मर्फी ( Tod Marfi ) याला संघाच्या बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मर्फीच्या जागेवर त्याने संघात कैमरन ग्रीन अथवा मिचेल स्टार्क या दोघांपैकी जो फिट असेल त्या खेळवावे, असे बॉर्डर याने म्हटले आहे.
या प्लेइंग इलेव्हनमध्ये बॉर्डर यांनी ट्रेविस हेड याला समाविष्ट केले आहे. पहिल्या सामन्यामध्ये हेड याला बाजूला ठेवल्याने अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली होती. मागली दोन मालिकांमध्ये हेड याने उत्तम कामगिरी केली होती.
दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. कसोटी मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे महत्वाचे राहणार आहे. याउलट भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेवरील आपली पकड आणखी मजबूत करण्याची तयारी करेल.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बॉर्डर यांनी निवडलेली प्लेइंग इलेवन : डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशाने, स्टीव स्मिथ, पीटर हैंड्सकॉम्ब, कैमरून ग्रीन, एलेक्स कैरी, पैट कमिंस, नाथन लियोन, जोस हेजलवुड.