Download App

Ind vs Eng : भारताचा इंग्लंडवर 434 धावांनी दणदणीत विजय; जैस्वाल, रवींद्र जडेजा ठरले ‘हिरो’

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Rajkot 3rd Test India beat England big margin : यशस्वी जैस्वालचे (Yashasvi Jaiswal) दुहेरी शतकाचा धमका आणि रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) फिरकीच्या जोरावर तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळविला. भारताने हा सामना 434 धावांनी जिंकला. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या काही षटकांत 122 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 445 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंड पहिल्या डावात 319 धावांत संपला. भारताने दुसऱ्या डावात 430 धावा करून डाव घोषित केला. इंग्लंडसमोर तब्बल 557 धावांचे मोठे लक्ष्य होते. पण चौथ्या दिवशीच इंग्लंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

विखेंची एक भेट अन् दोनच दिवसांत थेट निर्णय; कांदा निर्यात सुरु

सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत द्विशतक झळकविले. त्याने 214 धावांची जबरदस्त खेळी केली. त्यानंतर रवींद्र जडेजाने पाच बळी घेत इंग्लंडला पराभवाच्या छायेत ढकलले. तर पहिली कसोटी खेळत असलेल्या सर्फराजने खाननेही दोन्ही डावांमध्ये अर्धशतके झळकवत आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले. तिसऱ्या दिवशी यशस्वीने शतक झळकविले होते. शतकाचे आनंद साजरा करताना तो किरकोळ जखमी झाला. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. आज पुन्हा तो खेळायला आला. यशस्वी आणि सर्फराजने पाचव्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी केली. पहिल्या सत्राअखेर यशस्वी हा 149 धावांवर तर सर्फराज हा 22 धावांवर खेळत होता.

मनोज जरांगेंना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न; आंबेडकरांच्या आरोपाने एकच खळबळ

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला दोघांनीही फटकेबाजी करत संघाची धावसंख्या चारशेपार नेली. यशस्वीने 231 चेंडूत 214 धावांची नाबाद खेळी केली. त्याने 14 चौकार आणि 12 षटकारही मारले. तर सर्फराजही 68 धावांवर नाबाद राहिला. त्यानेही 6 चौकार आणि 3 षटकार मारले. या दोघांमध्ये पाचव्या गड्यासाठी 172 धावांची भागादारी झाली.

भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात शतक झळकविणाऱ्या बेन डकेटचा अडसर दूर झाला. तो अवघ्या चार धावांत बाद झाला. जॅक क्रॉली 11 धावांत बाद झाला. ओली पोपही दोन धावांवर तंबूत परतला. दुसऱ्या सत्राअखेर इंग्लंडचा गडगडला होता. त्यानंतर शेवटच्या सत्रात जडेजाने इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत पाठवले.

भारतीय फलंदाजांनी
कसोटीत पाडला षटकारांचा पाऊस

भारतीय फलंदाजांनी या सामन्यात तब्बल 28 षटकार मारले. कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय संघ ठरला. भारताने दुसऱ्या डावात 18 षटकार मारले आहेत. तसेच कसोटी मालिकेत सर्वाधिक 48 षटकार मारण्याचा विक्रमही भारतीय संघाने रचला आहे.

follow us

वेब स्टोरीज