IND VS ENG Semifinal : इंग्लंडचे 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात धोकादायक; वाचा कुंडली

IND VS ENG Semifinal विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनमध्ये साऊथ आफ्रीकेला पराभूत करत किवी संघाने अंतिम फेरीत एन्ट्री घेतली आहे.

IND VS ENG Semifinal : इंग्लंडचे 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात धोकादायक

IND VS ENG Semifinal : इंग्लंडचे 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात धोकादायक

IND VS ENG Semifinal : ICC T20 विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनमध्ये साऊथ आफ्रीकेला पराभूत करत किवी संघाने अंतिम फेरीत एन्ट्री घेतली आहे. त्यानंत आज (दि.5) भारत विरूद्ध इंग्लंड हे दोन संघ फायनलमध्ये एन्ट्री घेण्यासाठी आमने-सामने भिडणार आहे. मात्र, इंग्लंड संघात असणारे काही खेळाडू सामन्याचे चित्र बदलू शकतात. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला या भेदक खेळाडूंसमोर सावध पण उत्तम खेळी करण्याचे आव्हान असेल. इंग्लंडचे भेदक खेळाडू कोण? त्याबद्दल जाणून घेऊया…

तिलक – अभिषेक पैकी एक होणार बाहेर? उपांत्य फेरीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या

हॅरी ब्रूक

इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कठीण परिस्थितीतही संयम राखण्याची आणि धावा काढण्याची क्षमता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. ब्रूक जलद आणि हुशारीने फलंदाजी करण्यात पारंगत आहे, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना ब्रूक वादळ रोखण्यासाठई एक विशिष्ट रणनीती आखावी लागणार आहे.

जोफ्रा आर्चर

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो. कारण या विश्वचषकात त्याने अचूक गोलंदाजीने फलंदाजांना सातत्याने बेजार केले आहे. नवीन चेंडू स्विंग करण्याची आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता भारताच्या वरच्या फळीसमोर मोठे आव्हान निर्माण करू शकते.

भारताला मोठा धक्का; संजू सॅमसनला सेमीफायनलसाठी येणार बंदी, कारण काय ?

विल जॅक्स

विल जॅक्स हा इंग्लंडच्या सर्वात आक्रमक खेळाडूंपैकी एक आहे. तो त्याच्या मोठ्या फटकेबाजीच्या कौशल्यासाठी ओळखला जातो. त्याची ऑफ-स्पिन देखील संघासाठी उपयुक्त ठरते. भारताच्या मधल्या फळीत अनेक डावखुरे फलंदाज आहेत, त्यामुळे जॅक्सची गोलंदाजी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

आदिल रशीद

इंग्लंडचा अनुभवी लेग-स्पिनर आदिल रशीद हा भारताविरुद्ध बराच काळ प्रभावी ठरला आहे. त्याच्याकडे धावा रोखण्याची आणि मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे रशीद भारताच्या फलंदाजांसाठी एक मोठे आव्हान निर्माण करू शकतो.

फिल सॉल्ट

इंग्लंडचा सलामीवीर फिल साल्टची बॅट तळपली तर, तो सामन्याचा रंग पूर्णपणे बदलू शकतो. सॉल्ट पॉवरप्लेमध्ये मोठे शॉट्स मारण्यात पारंगत आहे. त्यामुळे जर सॉल्ट वानखेडेसारख्या फलंदाजीसाठी अनुकूल मैदानावर सेट झाला तर, भारतीय गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात.

रणजीमध्ये 67 वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरी; जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच ‘चॅम्पियन’

भारतासमोर मोठे आव्हान आहे

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला वरील पाच धोकादायक खेळाडूंना लवकर बाद करावे लागेल. जर भारतीय गोलंदाज या पाच खेळाडूंना नियंत्रित करण्यात यशस्वी झाले तर, अंतिम फेरीचा मार्ग खूप सोपा होऊ शकतो.

Exit mobile version