IND Vs ENG : सॅमसनची धुव्वादार खेळी; इंग्लंडसमोर ठेवलं 254 धावांचं लक्ष्य…

टी20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसरा सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने इंग्लडला ---धावांचं आव्हान दिलं असून संजू सॅमसमने चांगली कामगिरी केलीयं.

Untitle (17)

Untitle (17)

Ind Vs England : टी-20 विश्वचषक स्पर्धेतील दुसरा सेमी फायनल सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारत आणि इंग्लड यांच्यात हा सेमी फायनल सामना रंगलायं. इंग्लडने नाणेफेक जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला. भारताने फलंदाजी करीत इंग्लडसमोर 254 धावांचं आव्हान दिलंय. भारतीय संघाने 20 षटकांत 253 धावा करीत 7 विकेट गमावले आहेत. भारतीय फलंदाज संजू सॅमसनची चांगलीच बॅट तळपली असून सॅमसनने 42 बॉलमध्ये 89 रन्स केले आहेत. सॅमसनची साथ देत ईशान किशन, शिवम दुबे, यांनी साथ देत धावांचा डोंगर रचलायं.

राज्यसभेत आंबेडकरी चळवळीचा आवाज घुमणार… शिवसेनेकडून आक्रमक चेहरा, कोण आहे उमेदवार?

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 253 धावा केल्या. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इतकं मोठं लक्ष्य गाठायचं तर इंग्लंडला पहिल्या षटकापासून आक्रमक खेळी करावी लागेल. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 89 धावा केल्या. त्याने 42 चेंडूत 7 षटकार आमि 8 चौकार मारत या धावा केल्या. शिवम दुबेने 43, इशान किशन 39, हार्दिक पांड्या 27, तिलक वर्मा 21, अभिषेक शर्मा 9, सूर्यकुमार यादव 11 धावा करून बाद झाले.

Exit mobile version