IND vs NZ 2026 : भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर आता पुढील काही दिवसात वनडे मालिकेसाठी देखील भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात पाच खेळाडू पुनरागमन करु शकतात. पुढील आठवड्यात वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. वनडे मालिकेसाठी भारतीय संघात श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर,अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याचा दावा काही मीडिया अहवालात करण्यात आला आहे.
श्रेयस अय्यर
2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे श्रेयस अय्यरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत नव्हता. उपकर्णधार म्हणून तो आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कमबॅक करु शकतो.
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह देखील 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत व्यस्त होता, त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नाही. त्यामुळे आता निवडकर्ते त्याला न्यूझीलंड संघाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट करू शकतात.
अक्षर पटेल
अक्षर पटेल (Axar Patel) हा भारतीय वनडे संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे, परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा संघात परतला होता मात्र आता अक्षर पटेलला संघात परत बोलावले जाऊ शकते.
वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याला स्थान मिळाले नाही. वास्तविक, संघ व्यवस्थापनाला त्याला कसोटी सामन्यांसाठी तयार करायचे आहे. तो वनडे मालिकेतही खेळू शकतो. त्याला वनडे संघात परत बोलावले जाऊ शकते आणि कदाचित नमन धीरच्या जागी त्याचा समावेश होऊ शकतो.
मोहम्मद शमी
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आल्यानंतर आता भारतीय संघात वनडे मालिकेसाठी भारतीय संघात पुन्हा एकदा मोहम्मद शमीचा समावेश करण्यात येऊ शकतो अशी चर्चा सध्या जोराने सुरु आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) गेल्या वर्षात रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर शमी पुन्हा एकदा भारतीय संघात दिसू शकतो.
गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा, आकिब नबी आणि अंशुल कंबोज यांसारख्या युवा गोलंदाजांची कामगिरी वेस्ट इंडिजविरुद्ध निराशाजनक राहिल्याने देखील शमीच्या पुनरागमनच्या चर्चा जोराने सुरु आहे.
