भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया कपवर नाव कोरलं.
भारतीय संघाने ACC आणि PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला.
सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभातच वाद निर्माण झाला.
दुबईत रविवारी, 28 सप्टेंबरला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे.
मोहसीन नकवी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीही आहेत. त्यांनी भारत व भारतीय संघाबद्दल वादग्रस्त विधाने तसेच पोस्ट केल्या होत्या. त्यामुळेच टीम इंडियाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
Image 2025 09 29T111722.640