Download App

Ind VS Pak : पाकच्या बाजूने नाणेफेकीचा कौल; टीम इंडियाविरुद्ध बॅटिंगचा निर्णय…

आशिया कप 2025 स्पर्धेत दुबईच्या स्टेडियमवर थोड्याच वेळात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. पाकिस्तानने टॉस जिंकला असून बॅटिंगचा निर्णय घेतलायं.

Ind Vs Pak : आशिया कप 2025 स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind Vs Pak) सामना रंगणार आहे. दुबईत होणाऱ्या या सामन्यासाठी देशभरातून विरोध केला जात होता. अखेर आज सामन्यासाठी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकले असून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलायं. थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होणार असून या सामन्याकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलंय. या स्पर्धेत दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली असून दोन्ही संघांसाठी हा दुसरा सामना आहे. या सामन्याला थोड्याच वेळास सुरुवात होणार आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात फरार झालेल्या चौघांना बेड्या; थेट गुजरातमधून केली अटक

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव

महिला अधिकारी दमदाटी प्रकरणी फडणवीस तुमच्यावर नाराज? अजितदादा म्हणाले, “त्यांनी मला..”

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : सुफियान मुकीम, अबरार अहमद, साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आघा (कॅप्टन), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी

दरम्यान, आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना होत आहे. मात्र त्याआधीच भारतात वातावरण प्रचंड तापल्याचं पाहायला मिळालं. जनतेच्या मनात नाराजीचा सूर होता. लोकांनी अजून तरी नाराजी उघड केलेली नाही. मात्र विरोधकांनी या मुद्द्यावर जोरदार बॅटिंग सुरू केली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली.

काँग्रेस आणि अन्य पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या घडामोडी घडत असतानात दुबईत टीम इंडिया संभ्रमात पडली आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळावं की नको असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्याचं दिसून आलं होतं. अखेर आता थोड्याच वेळात हा सामना रंगणार आहे.

follow us