IND vs PAK : श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक 2023 चा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ पूर्ण ताकदीने खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
प्लेइंग इलेव्हन – फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
