IND vs SA: टीम इंडियाला धक्का, इशान किशनही कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला लागली ‘लॉटरी’

Ishan Kishan: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला (Team India) आणखी एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि दीपक चहर हे कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यानंतर आता भारतीय संघाला तिसरा झटका बसला आहे. फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) हा कसोटी संघातून बाहेर झाला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. […]

IND vs SA: टीम इंडियाला आणखी एक धक्का, इशान किशनही कसोटी मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला लागली 'लॉटरी'

Ishan Kisan

Ishan Kishan: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला (Team India) आणखी एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि दीपक चहर हे कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यानंतर आता भारतीय संघाला तिसरा झटका बसला आहे. फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) हा कसोटी संघातून बाहेर झाला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्याचा जागी आता केएस भरतला (KS Bharat) संधी देण्यात आली आहे.

“अजून म्हातारा झालेलो नाही, भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद” : खेडच्या घाटातून पवारांचा शड्डू

बीसीसीआयने (BCCI) आज एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. इशान किशनने आपल्या वैयक्तिक कारणामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. इशान किशनने बीसीसीआयला याबाबत एक विनंती केली होती. ही विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे. इशानला वनडे संघातही स्थान मिळाले नव्हते. टी-20 मालिकेतही त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता तो कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी विकेटकिपर केएस भरतला संघात घेण्यात आले आहे.

यापूर्वी विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही संघातून बाहेर झाला आहे. तंदुरुस्त नसल्याने त्याने माघार घेतली आहे. तर दीपक चाहरने वैयक्तिक कारणामुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली होती. दीपकच्या जागी आकाशदीपला संघात संधी देण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे कोणाचा हात? आंबेडकरांनी नाव घेऊन सांगितलं

कसोटी मालिकेसाठी संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (विकेटकीपर),शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

कसोटी मालिका कधीपासून ?
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिली लढत सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्टस पार्कमध्ये होणार आहे. दुसरी कसोटी कॅपटाऊनमध्ये खेळविली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर भारत आजपर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेला नाही. त्यामुळे हा इतिहास पुसण्यासाठी रोहितसेना मैदानात उतरेल.

Exit mobile version