IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी मोठा निर्णय ; भारतीय संघात 4 नवीन खेळाडूंचा समावेश

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय

IND Vs SL

IND Vs SL

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेत चार नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यर्तीत राहण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. यासाठी आता बीसीसीआयने चार नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे मात्र हे चारही खेळाडू नेट गोलंदाज म्हणून संघात सहभागी होणार आहे.

4 फिरकी गोलंदाजांचा समावेश

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका दौऱ्यासाठी (IND vs SL Test Series) भारतीय संघासबोत चार नेट गोलंदाज देखील जाणार आहे. ज्यामध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबे (Harsh Dubey) , ऑफ-स्पिनर तनुष कोटियन, लेग-स्पिनर विपराज निगम आणि डावखुरा रिस्ट-स्पिनर शिवांग कुमार यांचा समावेश आहे.

चार नेट गोलंदाजांची गरज का ?

श्रीलंका दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) , कुलदीप यादव (Kuldeep Yadav) , मानव सुथार आणि सारांश जैन या चार फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे मात्र आता आणखी चार फिरकी गोलंदाजांची नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे भारताकडे सरावासाठी एकूण आठ गोलंदाज उपलब्ध असतील.

श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना मदत करत असल्याने आणि न्यूझीलंड तसेच दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध झालेल्या मायदेशातील कसोटी मालिकेत झालेल्या पराभावामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून फिरकी गोलंदाजीचा सामना करणे ही भारतीय संघाची एक कमकुवत बाजू राहिली आहे.

श्रीलंका दौऱ्यानंतर गौतम गंभीरची हकालपट्टी? BCCI अ‍ॅक्शन मोडवर

श्रीलंका मालिकेदरम्यानही फिरकी गोलंदाज भारतासाठी अडचण निर्माण करु शकतात यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून चार फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

Exit mobile version