वेस्ट इंडिजने उभारली मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या, हेटमायर-होपने धू धू धुतले

IND vs WI: चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 विकेट गमावत 178 धावा केल्या. वेस्ट इंडिज संघाकडून शिमरॉन हेटमायरने 39 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. तर शाई होपने 29 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले तर कुलदीप यादवने […]

IND Vs WI

IND Vs WI

IND vs WI: चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 विकेट गमावत 178 धावा केल्या. वेस्ट इंडिज संघाकडून शिमरॉन हेटमायरने 39 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. तर शाई होपने 29 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. कॅरेबियन संघाला पहिला धक्का 19 धावांच्या स्कोअरवर बसला. त्याचवेळी 55 धावांवर दुसरा धक्का बसला, पण काही वेळातच 4 कॅरेबियन फलंदाज 57 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. म्हणजे, वेस्ट इंडिजचे 3 खेळाडू अवघ्या 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.

किशोरी पेडणेकरांवर आर्थिक गुन्हे शाखेची वक्रदृष्टी, कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी बजावले समन्स

मात्र, शिमरान हेटमायरने झंझावाती खेळी करत संघाची धावसंख्या 178 धावांपर्यंत पोहोचवली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना 1-1 असे यश मिळाले.

Exit mobile version