IND vs AUS Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा महामुकाबला (IND vs AUS Final) होणार आहे. मात्र फायनलपूर्वी दोन्ही संघांना डिनरचे खास निमंत्रण मिळाले आहे. साबरमती नदीवर बांधण्यात आलेल्या रिव्हर क्रूझमधून दोन्ही संघांना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन फायनल मॅच खास बनवण्याच्या तयारीत आहे.
रिव्हर क्रूझ रेस्टॉरंट (River Cruise Restaurant) अहमदाबादच्या साबरमती नदीवर बांधले आहे. रेस्टॉरंटचे मालक सुहर मोदी यांनी सांगितले की, विश्वचषकापूर्वी सर्व संघांना जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आता स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांसाठी डिनरची (River Cruise Dinner) तयारी केली जात आहे. यामध्ये भरड धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बाजरी वापरली जाणार आहे. रात्रीच्या जेवणाच्या मेनूमध्ये गुजराती पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय खेळाडू अटल फूट ओव्हर ब्रिजलाही भेट देणार आहेत.
World Cup Final : फायनल मॅच तुम्ही विसरणारच नाही; गुजरात सरकारचं सुपरडुपर प्लॅनिंग!
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्डकप फायनलपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले आहेत. ऑस्ट्रेलियाबाबत रोहित म्हणाला की ऑस्ट्रेलियाने शेवटचे आठ सामने जिंकले असले तरी आम्हाला कोणताही फरक पडत नाही. आम्ही 2 वर्षे आधीपासून विश्वचषकाची तयारी केली असल्याचे त्याने सांगितले.
“भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी बीचवर…” : साऊथ अभिनेत्रीच्या घोषणेने आधुनिक पुनम पांडेची आठवण
India and Australia likely to have dinner together on the Sabarmati riverfront cruise and also visit Atal Foot Over Bridge. (Ahmedabad Live). pic.twitter.com/ErWI4X4pIy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 18, 2023
रोहित म्हणाला की आम्हाला यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे की काय महत्वाचे आहे. या गोष्टीवर खूप फोकस आणि वेळ दिला गेला आहे आणि आम्हाला त्यावरच ठाम राहावे लागेल. पहिल्या सामन्यापासून आम्ही एक गोष्ट कायम ठेवली आहे आणि ती म्हणजे संयम. भारतीय क्रिकेटपटू असल्यामुळे दडपणांना सामोरे जावे लागते आणि ते सतत असते. एलिट अॅथलीट म्हणून तुम्हाला टीका, दबाव आणि कौतुकाचा सामना करावा लागतो, असे तो म्हणाला.