आशिया कप जिंकला! भारतीय बहाद्दर खेळाडूंनी पाणी पाजलं, पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय

आज रविवार (दि. 28 सप्टेंबर)रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना झाला. भारताने बाजी मारली.

India Vs Pakistan

India Vs Pakistan

आज रविवार (दि. 28 सप्टेंबर)रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टी 20 आशिया कप 2025 (T20) स्पर्धेतील अंतिम सामना भारत पाकिस्तानमध्ये झाला. या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला सहा गडी राखून पाणी पाजलं आहे.

तिलक वर्मा याने 15 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकला. यासह टीम इंडियाने 100 धावा पूर्ण केल्या. तिलकने 16 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 1 धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं.

मोठी बातमी! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची वर्णी; वाचा, कोण आहेत मन्हास?

टीम इंडियाने पावरप्लेमध्ये झटपट 3 विकेट्स गमावल्या होत्या. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल अशा 3 मोठ्या विकेट्स भारताने गमावल्या होत्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे असं काहीवेळ वाटत होतं.

ओपनर अभिषेक शर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव झटपट आऊट झाल्यानंतर तिलक वर्मा आणि शुबमन गिल या जोडीकडून भारताला आशा होत्या. मात्र शुबमनने या सामन्यातही निराशा केली. शुबमन चौथ्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर 12 रन्स करुन कॅच आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 4 ओव्हरनंतर 3 आऊट 20 अशी स्थिती झाली होती.

Exit mobile version