पावसामुळे भारत-पाक सामना रद्द, पाकिस्तान सुपर-4 मध्ये पात्र

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह पाकिस्तानचा संघ तीन गुणांसह सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, भारत नेपाळकडून पराभूत झाल्यास आशिया चषकातून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा […]

India Vs Pakistan

India Vs Pakistan

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह पाकिस्तानचा संघ तीन गुणांसह सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, भारत नेपाळकडून पराभूत झाल्यास आशिया चषकातून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा सुपर-4 मध्ये भिडणार आहेत.

10 वाजेपर्यंत पंचांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे अखेर पंचांनी सामना रद्द म्हणून जाहीर केला. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण दिले आहेत.

Exit mobile version