नवी दिल्ली : महिला T20 विश्वचषक (ICC Women T20 WC 2023) चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) यांच्यामध्ये आज 23 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतासाठी हा करा किंवा मरो असा सामना आहे, तर ऑस्ट्रेलिया सलग तिसरे विजेतेपद मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
या सामन्यात न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. दरम्यान न्यूलँड्सची खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली आहे. वेगवान गोलंदाज खेळपट्टीवर बाऊन्स आणि स्विंग मिळवू शकतात.
येथे खेळल्या गेलेल्या 29 टी-20 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ 9 वेळा विजय मिळवता आला तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 18 सामने जिंकले. यावरून असे म्हणता येईल की नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करू शकतो. भारताला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड. .
BBC वरील कारवाई ही माध्यमांची गळचेपी; आम्ही BBC च्या पाठिशी; ब्रिटनच्या संसदेतही उमटले पडसाद
ऑस्ट्रेलिया संघ: मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिसा हिली, डी’आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हीदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम