Download App

दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला, भारताकडे 80 धावांची आघाडी

ढाका : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर भारत आता दुसरा सामना खेळत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीच खेळ संपला आहे. ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु सामन्यात भारताने आधी 227 धावांवर बांगलादेशला सर्वबाद केलं. ज्यानंतर भारताने पंतच्या 93 आणि अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 314 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.

दिवस संपताना बांगलादेशचा स्कोर 7 धावांवर शून्य बाद होता. ज्यामुळे भारत 80 धावांच्या आघाडीवर आहे. सामन्यात आधी नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला.

यावेळी बांगलादेशसाछी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे बांगलादेश 200 पार धावसंख्या पोहचवू शकला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या.

Tags

follow us