Download App

IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा सामना आज रंगणार

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना छत्तीसगडमधील रायपूर स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघ मालिका विजयाकडे वाटचाल करू शकतो.

दुसरा एकदिवसीय सामना छत्तीसगडमधील रायपूर स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर यापूर्वीही अनेक सामने आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये आयपीएल सामन्यांचाही समावेश आहे, परंतु आतापर्यंत या मैदानावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही.

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाणार आहे. तर हा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार) वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक

न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

Tags

follow us