Download App

IPL 2023 : IPLच्या दिमाखदार सोहळ्यात दिसणार दिग्गज अभिनेत्रींचा जलवा

IPL 2023 Opening Ceremony : आयपीलच्या 16 व्या हंगामाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. यासाठी सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 16 व्या सिझनच्या ओपनिंग सेरेमनीसाठीदेखील जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

31 मार्च रोजी  या सीझनमधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी आयपीएलची ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे. या सेरेमनीमध्ये भारतीय सिनेसृष्टीतील स्टार्स परफॉर्म करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री रश्मिका मंधाना आणि तमन्ना भाटिया या दोन दिग्गज अभिनेत्री या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स करणार असल्याचे सांगितले जात आहे.

तर, काही मीडिया रिपोर्टच्या अंदाजानुसार कॅटरीना कैफ, टाइगर श्रॉफ व अरिजीत सिंह हे कलाकार आयपीएल 2023 साठी परफॉर्म करु शकतात. हा  इव्हेंट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होणार आहे. या दोन्ही संघामध्ये आत्तापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने चेन्नईला क्रमश 3 व 7 विकेटने मात दिली आहे.

 

आयपीएलच्या  16 व्या सीजनची पहिली मॅच गतवर्षीची चॅम्पियन टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार असून, गुजरात संघाची कमान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या तर, चेन्नई सुपर किंग्सची जबाबदारी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी सांभाळणार आहे.

 

गतवर्षी गुजरातने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती तर, चेन्नई सुपर किंग्स  ही पॉइंट्स टेबलवर 10 व्या व 9 व्या स्थानावर होती. त्यामुळे या सीझनची सुरुवात चेन्नईसाठी कशी असेल ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

गुजरात टायटन्स (GT) संघ

हार्दिक पांड्या (कॅप्टन), अभिनव मनोहर, डेविड मिलर, शुभमन गिल, मैथ्यू वेड, रिद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर , अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, के.एस. भरत और मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ 

एमएस धोनी (कॅप्टन), डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रीटोरियस, मिशेल सेंटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राजवर्धन हैंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर , महेश ठीकशाना, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीशा पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु, काइल जैमीसन, और अजय मंडल.

Tags

follow us