Jamshedpur FC : फुटबॉल विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जमशेदपूर एफसीने (Jamshedpur Football Club) 2026-27 हंगामापासून इंडियन सुपर लीगमध्ये (Indian Super League) सहभागी न होण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे सलग नऊ वर्षांचा क्लबचा आयएसएलमधील प्रवास संपुष्टात आला आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF)ने लागू केलेल्या नव्या व्यावसायिक सहभाग नियमांनुसार निश्चित मुदतीत सहभाग शुल्क न भरल्याने हा निर्णय घ्याला लागल्याचे समोर आले आहे. पंरतु एका मोठा नामांकित संघाने माघार घेतल्याने भारतीय फुटबॉलपुढे नवे संकट उभे राहिले आहे.
Jamshedpur FC have sought an extension till July 31 to decide on participation in the Indian Super League
फुटबॉल फेडरेशनने नव्या व्यावसायिक धोरणानुसार प्रत्येक क्लबसाठी 55 लाख रुपयांचे सहभाग शुल्क निश्चित केले होते. हे शुल्क भरण्याची अंतिम मुदत 20 जुलै होती. मात्र, जमशेदपूर एफसी आणि इंटर काशी या दोनच क्लबांनी वेळेत शुल्क भरले नव्हते. AIFF ने मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली. त्यानंतर इंटर काशीने मोठा हिस्सा जमा केला, मात्र जमशेदपूर एफसीने शुल्क न भरल्याने त्यांचा आयएसएलमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला.
Club Statement. pic.twitter.com/zYTnMTKo62
— Jamshedpur FC (@JamshedpurFC) July 31, 2026
जमशेदपूर एफसीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “जमशेदपूर फुटबॉल क्लब 2026-27 हंगामापासून इंडियन सुपर लीगमध्ये सहभागी होणार नाही. क्लबने पुढे स्पष्ट केले की, आयएसएलमधून बाहेर पडत असला तरी भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी त्यांची बांधिलकी कायम राहील. विशेषतः तळागाळातील फुटबॉल, युवा खेळाडूंची जडणघडण आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिभावान खेळाडू घडविण्याचे कार्य सुरूच राहणार आहे.
आयएसएलमधून माघार का?
सूत्रांच्या माहितीनुसार, AIFF ने लागू केलेल्या नव्या सहभाग शुल्काच्या अटींचे पालन करण्यात जमशेदपूर एफसी अपयशी ठरला. क्लबने आपल्या निवेदनात शुल्काचा थेट उल्लेख केला नसला तरी नव्या सहभाग धोरणाशी संबंधित परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयामुळे आधीच प्रशासकीय आणि व्यवस्थापनाशी संबंधित अडचणींचा सामना करणाऱ्या भारतीय फुटबॉलमध्ये आणखी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
नऊ वर्षांचा यशस्वी प्रवास
2017 मध्ये टाटा स्टीलने आयएसएल विस्तार प्रक्रियेत स्थान मिळवल्यानंतर जमशेदपूर एफसीची स्थापना झाली होती. अल्पावधीतच क्लबने व्यावसायिक व्यवस्थापनामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. क्लबचे सर्वात मोठे यश म्हणजे 2021-22 हंगामात प्रशिक्षक ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकलेली ISL लीग विनर्स शिल्ड. तसेच जमशेदपूरमधील JRD टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या स्वतःच्या स्टेडियम आणि प्रशिक्षण सुविधांमुळेही क्लबची विशेष ओळख होत
