Download App

WC 2023 : भारत वि. पाक सामन्यात फेरबदल होणार? जय शाह यांचे मोठे विधान

Jay Shah On World Cup 2023 Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सांगितले की, आयसीसीच्या तीन सदस्यांनी आयसीसीला पत्र लिहून २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली आहे. विश्वचषक सामन्याचे आयोजन करणार्‍या संघटनेशी बोलल्यानंतर जय शाह म्हणाले की, वेळापत्रकातील बदलाचा मुद्दा 3 ते 4 दिवसांत सोडवला जाईल.

जय शाह म्हणाले, “तीन सदस्यांनी वेळापत्रकात बदल करण्यासाठी आयसीसीला पत्र लिहिले आहे. फक्त तारीख आणि वेळा बदलल्या जातील, स्थळे बदलली जाणार नाहीत. जर सामन्यांमध्ये 6 दिवसांचे अंतर असेल तर ते 4-5 दिवसांपर्यंत कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत तीन ते चार दिवसांत चित्र स्पष्ट होईल. आयसीसीशी सल्लामसलत करून यात बदल केले जातील.

Video : अन् अनिल कपूरच्या जर्मन चाहत्याने रस्त्यावर लावलं ‘राम लखन’ चं गाणं पाहा…

गुजरातमधील नवरात्रीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तारखेत बदल होऊ शकतो, असे वृत्त यापूर्वी आले होते. नवरात्रीवर लक्ष ठेवून सुरक्षेचा हवाला देण्यात आला होता. अशा परिस्थितीत, सामन्याचे वेळापत्रक बदलल्याने संपूर्ण कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो. भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला होणार असल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, मात्र आयसीसीच्या वेळापत्रकानुसार १४ तारखेला दोन सामने होणार आहेत.

अशा स्थितीत एका दिवसात तीन सामने होणे शक्य नाही. जय शाह यांना भारत-पाक सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत विचारले असता जय शाह म्हणाले की, सुरक्षेचा मुद्दा नाही. आयसीसीच्या कोणत्या पूर्ण सदस्यांनी वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली आहे हे शाह यांनी उघड केले नाही.

गदर 2 चं महाभारताशी आहे खास कनेक्शन; दिग्दर्शकांनी केला खुलासा…

दरम्यान, आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत.

 

Tags

follow us