Download App

IND vs AUS 2nd Test : कांगारूंचा पहिला डाव 263 धावांत आटोपला, शमीने घेतल्या 4 विकेट

  • Written By: Last Updated:

दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन संघ 78.4 षटकात 263 धावांवर गारद झाला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 21 धावा केल्या आहेत.

उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्बची शानदार खेळी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराश केले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक धावा केल्या. उस्मान ख्वाजा 81 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार मारला. याशिवाय पीटर हँड्सकॉम्बने नाबाद 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

‘वर्षा’वर मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार पाहुणचार, जेवणावळीवर ३ महिन्यात कोट्यवधींचा खर्च 

मोहम्मद शमी, रवी अश्विन आणि जडेजा चमकले

भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक बळी घेतले. या वेगवान गोलंदाजाने 14.4 षटकात 60 धावा देत ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. याशिवाय रवी अश्विन आणि रवींद्र जडेजाने 3-3 विकेट घेतल्या. मात्र, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना यश मिळाले नाही.

Tags

follow us