राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूल सज्ज, दोन दिवस रंगणार स्पर्धा

स्पर्धेसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण झाली असून त्याकामी गौतम पब्लिक स्कूलचे हॉकी मैदाने सज्ज करण्यात आलेली आहे.

News Photo   2025 12 05T195053.908

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूल सज्ज, दोन दिवस रंगणार स्पर्धा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे (Kale) एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ ते ७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर होणार आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पूर्ण झाल्या असून गौतम पब्लिक स्कूल सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील आठ विभागातील मुला मुलींचे एकूण १६ हॉकी संघ सहभागी होणार आहे अशी माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

या भव्य राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवार (दि.०६) रोजी सकाळी १०:३० वाजता होणार असून याप्रसंगी पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे उपस्थित राहणार आहेत. पारितोषिक वितरण संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सदर स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, सिलेक्शन कमिटी, सहभागी संघ प्रशिक्षक, संघव्यवस्थापक, सर्व संघातील खेळाडू, पंच तसंच, सिलेक्शन ट्रायलसाठी शंभरहून अधिक खेळाडू उपस्थित राहणार आहे. सहभागी सर्व संघांतील खेळाडूंची त्यांच्या प्रशिक्षकांची जेवणाची व राहण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

कोपरगावात वाढत्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, आमदार काळेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माणी

स्पर्धेसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण झाली असून त्याकामी गौतम पब्लिक स्कूलचे हॉकी मैदाने सज्ज करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा १४ वर्षाखालील हॉकी संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. सिलेक्शन कमिटीद्वारे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड होणार असून सदर संघ राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सचिव चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे प्राचार्य नूर शेख, क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, प्रकाश भुजबळ, उत्तम सोनवणे, नासिर पठाण, कॅम्पस सुपरवायझर सुनील सूर्यवंशी, मेस विभागातील त्रिंबक वर्पे, अशोक कंक्राळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत आहे.

Exit mobile version