Download App

बांगलादेशचा डाव 227 धावांत गुंडाळला !; यादव-अश्विनची जबरदस्त गोलंदाजी

  • Written By: Last Updated:

मिरपूरः मिरपूर कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेश संघ 227 धावांत गारद झालाय. भारताचे गोलंदाज उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्यात.

सलामीवीर शुभमन गिल 14 आणि केएल राहुल तीन धावांवर खेळत आहेत. त्यापूर्वी बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली होती. परंतु ठराविक अंतराने विकट्स पडल्याने बांगलादेश संघ 74.5 षटकांत 227 धावांच करू शकला. त्यात मोमिनूल हकने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. तर भारताकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी चार विकेटस् घेतल्या. तब्बल बारा वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटने दोन विकट्स घेतल्या.

बांगलादेशचे सलामीवीर जनमुल हुसैन शांतो आणि जाकिर हसन यांनी पहिल्या विकेट्ससाठी 39 धावांची भागीदारी केली. उनाडकटने हसनला तंबूत परतविले. त्यानंतर शांतोलाही 24 धावांवर अश्विनने झेलबाद केले. तिसऱ्या विकेटसाठी शाकिब अल हसन आणि मोमिनुलने 43 धावांची भागिदारी केली. पण उमेश यादवाने 16 धावांवर शाकिबला बाद केले. त्यानंतर मुशफिकूर आणि लिटन दासही बाद झाले. मुशाफिकूर आणि लिटनने 25 धावांची खेळी केली.

बांगलादेशचा अर्धासंघ 172 धावांत तंबूत परतला होता. पण मोमिनूल हकने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हकने अर्धशतक झळकवले. तो 84 धावांत बाद झाला. त्यानंतर मात्र विकेट पडत गेल्याने बांगलादेशचा पहिला डाव 227 धावांत संपुष्टात आला.

Tags

follow us