Download App

MPL : महाराष्ट्र प्रीमियर लीगचा महासंग्राम उद्यापासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक

  • Written By: Last Updated:

MPL : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL) स्पर्धा 15 जूनपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. आज एमपीएलचे वेळापत्रक जारी करण्यात आलेय. प्रत्येक संघाचे पाच सामने होणार आहेत. (mpl-2023-maharashtra-premier-league-2023-schedule-teams-players-list-squad-latest)

15 जूनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा 29 जून रोजी समारोप होणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे खेळले जातील. एमपीएल स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत. त्यातील 15 साखळी सामने, तर उर्वरित 4 प्ले-ऑफचे सामने असतील. या स्पर्धेत प्रत्येक संघ प्रत्येकी 5 सामने खेळणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेत महिला क्रिकेटचे तीन प्रदर्शनीय सामनेही खेळवले जाणार आहेत.

पुणेरी बप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. त्याआधी ओपनिंग सरेमनिचा कार्यक्रम रंगणार आहे. अमृता खानविलकर हिच्यासह अन्य कलाकार परफॉर्म करणार आहेत.

WhatsApp Image 2023 06 14 At 6.49.31 PM

15 जून 2023 –

08 PM – पुणेरी बप्पा vs कोल्हापूर टस्कर्स

16 जून 2023 –

02 PM – इगल नाशिक टायटन्स vs छत्रपती संभाजी किंग्स

08 PM – रत्नागिरी जेट्स vs सोलापूर रॉयल्स

17 जून 2023 –

08 PM – कोल्हापूर टस्कर्स vs रत्नागिरी जेट्स

18 जून 2023 –

02 PM – इगल नाशिक टायट्नस vs सोलापूर रॉयल्स

08 PM – पुणेरी बप्पा vs छत्रपती संभाजी किंग्स

19 जून 2023

08 PM – पुणेरी बप्पा vs इगल नाशिक टायट्नस

20 जून 2023 –

02 PM – सोलापूर रॉयल्स vs कोल्हापूर टस्कर्स

08 PM – रत्नागिरी जेट्स vs छत्रपती संभाजी किंग्स

21 जून 2023 –

08 PM – इगल नाशिक टायट्नस vs रत्नागिरी जेट्स

22 जून 2023 –

02 PM – छत्रपती संभाजी किंग्स vs कोल्हापूर टस्कर्स

08 PM – पुणेरी बप्पा vs सोलापूर रॉयल्स

23 जून 2023 –

08 PM – सोलापूर रॉयल्स vs छत्रपती संभाजी किंग्स

24 जून 2023

02 PM – पुणेरी बप्पा vs रत्नागिरी जेट्स

08 PM – कोल्हापूर टस्कर्स vs इगल नाशिक टायट्नस

08 PM – 25 जून 2023 – क्वालिफायर 1

08 PM – 26 जून 2023 – एलिमेनर

08 PM – 27 जून 2023 – क्वालिफायर 2

08 PM – 29 जून 2023 – फायनल

Tags

follow us