Nagar Rising Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Marathon) स्पर्धा (Competition) आज (रविवारी, 1 फेब्रुवारी ) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर प्रकारात भूषण भाटिया, सूर्यकांत पारधी, आश्लेषा पाटील, स्मिता उकिर्डे यांनी, तर 10 किलोमीटर प्रकारात मंगेश रासकर, अजय नारुका, अर्जिता, मंगल बोठे यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक (number one) मिळवला.
नगर रायझिंग फाउंडेशनने (Nagar Rising Marathon) या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत हजाराे नागरिकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाले. स्पर्धेत 21 किलोमीटर मॅरेथॉनला नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी, तर 10 व 4 किलोमीटरच्या उद्योजिका रिंकू फिरोदिया हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, नगर रायझिंगचे संचालक संदीप जाेशी, ‘साेहम ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, नगर रायझिंगचे ट्रस्टी डॉ. सतीश सोनवणे, डॉ. श्याम तारडे, अॅड. गौरव मिरीकर, नगर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी आदी उपस्थित होते.
स्पर्धकांचा सन्मान
ही मॅरेथॉन स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किलोमीटर व 4 किलोमीटर अशा तीन प्रकारांत झाली. सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, चेस नंबर, भेट वस्तू व पदक देण्यात आले. या स्पर्धेसाठी आय लव्ह नगर, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व मॅक्सिमस स्पोर्टस अॅकॅडमी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत.
तर बीगॉस इलेक्ट्रिक, सुहाना मसाले, ओप्पो मोबाईल, सी.टी. पंडोल अॅण्ड सन्स, हेमराज केटर्स, हायड्रेशन पार्टनर क्लिअर, मेडिकल पार्टनर अहमदनगर रिहॅब सेंटर, रिकवरी पार्टनर बाईक टेक पॉईंट, मोबिलीटी पार्टनर ओप्पो हे सह प्रायोजक होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी या स्पर्धेत सहभागी हाेत या मॅरेथाॅनचा आनंद लुटला. यात माजी आमदार नरेंद्र घुले, क्षितिज घुले, नमिता मुंदडा, श्रीनिवास बोज्जा आदी मॅरेथाॅनमध्ये सहभागी झाले हाेते.
‘हे’ आहे स्पर्धेचे विजेते
21 किलाेमीटर
युवक
प्रथम – भूषण भाटिया
द्वितीय – राज सिंग
तृतीय – ऋतिक पटेल
ज्येष्ठ
प्रथम – सूर्यकांत पारधी
द्वितीय – ज्ञानेश्वर घोरगे
तृतीय – रवींद्र चोभे
युवती
प्रथम – अश्लेषा पाटील
द्वितीय – जया खंडेलवाल
तृतीय – शीतल कर्पे
ज्येष्ठ
प्रथम – स्मिता उकिर्डे
द्वितीय – कविता खंडेलवाल
तृतीय – रुपाली खंडेलवाल
10 किलाेमीटर
युवक
प्रथम – मंगेश रासकर
द्वितीय – पंकज पिंत
तृतीय – जालिंदर चेमटे
ज्येष्ठ
प्रथम – अजय नारुका
द्वितीय – महेश मुळे
तृतीय – बाजीराव बोठे
युवती
प्रथम – अर्जिता
द्वितीय – स्मिता तांबडे
तृतीय – सलोनी चोरबेले
कर चुकवणाऱ्यांना आता शिक्षा नाही, फक्त दंड; निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
ज्येष्ठ महिला
प्रथम – मंगल बोठे
द्वितीय – चैताली गांधी
तृतीय – प्राची पवार
