Download App

NZ vs SL : न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची झाली पळता भुई

NZ vs SL 2nd T-20 :   ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs SL) न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19 षटकांत 141 धावांत आटोपला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 14.4 षटकांत 146 धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे मालिका 1-1 च्या बरोबरीत आली आहे. न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेला त्याच्या घातक गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

नाणेफेक गमावल्यानंतर श्रीलंकेने 18 धावांवर कुसल मेंडिसच्या रूपाने पहिली विकेट गमावली. तो 10 धावा काढून बेन लिस्टरचा बळी ठरला. कर्णधार दासुन शनाकाने 7 आणि वानिंदू हसरंगाने 9 धावा केल्या. इथून चरित अस्लंका वगळता इतर फलंदाज टिकू शकले नाहीत आणि संघाला पूर्ण ओव्हर्सही खेळता आलेल्या नाहीत. अस्लंकाने 24 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने पाच आणि बेन लिस्टरने दोन विकेट घेतल्या. त्याचबरोबर तीन गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

‘बलोच’मध्ये दिसणार मराठ्यांची शौर्यगाथा, प्रवीण तरडेंच्या मोशन पोस्टरने वेधले लक्ष

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी 3.2 षटकांत 40 धावा जोडल्या. 15 चेंडूत 31 धावांची झटपट खेळी करत चाड बोवेस कसून राजिताचा बळी ठरला. येथून टीम सिफर्टने धडाकेबाज फलंदाजी केली आणि त्याला दुसऱ्या टोकाकडून कर्णधार टॉम लॅथमने साथ दिली. सिफर्टने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आणि लॅथम यांनी 106 धावांची अखंड भागीदारी केली आणि न्यूझीलंडने मोठा विजय नोंदवला. सेफर्टने 43 चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 79 धावा केल्या.

Narayan Rane यांची ‘फडतूस’ वादात उडी! उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला कलंक…

Tags

follow us