NZ vs IND : न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या मालिकेतून ‘हा’ स्टार गोलंदाज बाहेर

NZ vs IND : भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध दौरा सुरु करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी20, एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळणार आहे.

NZ Vs IND

NZ Vs IND

NZ vs IND : भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध दौरा सुरु करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी20, एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळणार आहे. टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या मालिकेपूर्वीच यजमान न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. मालिकेपूर्वी दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या टी20 संघातून आधीच दोन खेळाडू बाहेर पडले आहेत. तर आता आणखी एक स्टार गोलंदाज एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. दुखापतीतून सावरण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विल ओ’रूर्केला भारता विरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे.

विल ओ’रूर्के भारता विरुद्ध खेळणार नाही

न्यूझीलंड क्रिकेटने (NZ vs IND) दिलेल्या माहितीनुसार, हॅमस्ट्रिंग आणि कॅल्फ दुखापतीतून सावरत असल्यामुळे विल ओ’रूर्के (Will O’Rourke) भारता विरुद्धच्या आगामी मालिकेचा भाग नसणार आहे. त्याला एकदिवसीय आणि कसोटी संघात समाविष्ट करण्याबाबत चर्चा झाली होती, परंतु या टप्प्यावर वेगवान गोलंदाजाच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही.  त्याऐवजी, डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त असावा, याची त्यांना खात्री करायची आहे.

एप्रिल 2025 मध्ये विल ओ’रूर्केला पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली होती, ज्यामुळे तो सात महिने खेळापासून दूर राहिला. बांगलादेश दौऱ्यादरम्यान त्याने पुनरागमन केले आणि तीन एकदिवसीय सामन्यांत भाग घेतला. त्यानंतर, त्याने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळली, जिथे त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आणि नंतर कॅल्फ वेदना जाणवल्या. तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे आणि भारता विरुद्धच्या मालिकेचा भाग नसेल.

विल ओ’रूर्केबद्दल मुख्य प्रशिक्षकाने काय म्हटले?

न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले, भारता विरुद्धची अशी मोठी मालिका विल ओ’रूर्केला मुकावी लागणे अत्यंत निराशाजनक आहे. तो एकदिवसीय आणि कसोटी मालिकेचा भाग असणार होता, परंतु चर्चा केल्यानंतर आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की, त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक वेळ हवा आहे, जेणेकरून तो गोलंदाजीचा ताण पेलू शकेल.

टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका

 

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 22 ऑक्टोबर क्राइस्टचर्च
दुसरा टी-20 24 ऑक्टोबर क्राइस्टचर्च
तिसरा टी-20 27 ऑक्टोबर वेलिंग्टन
चौथा टी-20 30 ऑक्टोबर ऑकलंड
पाचवा टी-20 1 नोव्हेंबर हॅमिल्टन

 एकदिवसीय मालिका

सामना तारीख ठिकाण
पहिला ODI 4 नोव्हेंबर ऑकलंड
दुसरा ODI 7 नोव्हेंबर वेलिंग्टन
तिसरा ODI 10 नोव्हेंबर हॅमिल्टन
चौथा ODI 13 नोव्हेंबर माउंट मौंगानुई
पाचवा ODI 15 नोव्हेंबर माउंट मौंगानुई

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या ताब्यात-

 कसोटी मालिका

सामना तारीख ठिकाण
पहिली कसोटी 19 ते 23 नोव्हेंबर वेलिंग्टन
दुसरी कसोटी 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर क्राइस्टचर्च

 

Exit mobile version