Pakistan Cricket : विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत (AUS vs PAK) पाकिस्तानी संघाने अत्यंत खराब कामगिरी केली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Australia) व्हाईट वॉश देत मालिका विजय साकारला. यानंतर आता पाकिस्तान क्रिकेटने (Pakistan Cricket) कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला फटका संघाच्या प्रशिक्षकांना बसला आहे. कर्णधारापासून प्रशिक्षकपदापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.
पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर विदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक या तिघांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तान संघ विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये दाखल होऊ शकला नव्हता. यानंतर संघात मोठे बदल झाले होते. बाबर आझमने (Babar Azam) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कलनेही आधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया मालिकेच्या आधी नवीन कोचिंग स्टाफ नियुक्त करण्यात आला होता आता मालिकेतील अत्यंत निराशाजनक कामगिरीनतंर या प्रशिक्षकांचीही सुट्टी करण्यात आली आहे.
AUS vs PAK : कांगारूंचा पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरचा सामना जिंकत मालिकाही खिशात
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तिघांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की पीसीबीचे अध्यक्ष अश्रफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर या तिघांशी लवकरच चर्चा करणार आहेत. आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाचा हिस्सा राहिलेल्या आर्थर, ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांनी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले आहे की पाकिस्तान संघासाठी त्यांच्या सेवांची आता गरज नाही. या निर्णयानंतर तिघेही प्रशिक्षकपदी राहणार नसले तरी यात त्यांचे नुकसान होणार नाही. कारण बोर्ड आणखी काही महिने त्यांना पगार देत राहिल.
बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की फलंदाजी प्रशिक्षक अँड्र्यू पुटीक यांनी करार करण्याआधी अफगाणिस्ताबरोबरील नव्या जबाबदारीची माहिती दिली होती. ब्रॅडबर्न यांनीही पीसीबीला सांगितले होते की इंग्लिश काउंटी ग्लेमोर्गन त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू इच्छित आहे. नवीन प्रशिक्षक मिळालेले असतानाही ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 असा दणदणीत पराभव केला होता.
IND vs AFG: टी-20 मालिकेसाठी रोहित, कोहलीचे संघात ‘कमबॅक’ गोलंदाजीमध्ये मोठे बदल