Download App

आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत पंकज भुजबळांच्या लेकींची सुवर्ण कामगिरी

मुंबई : इंग्लंड (England)येथील केंट शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे (International Field Association)आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023’ (World Indoor Archery Championship 2023) या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal)यांच्या दोन्ही मुली देविशा (Devisha)व तनिष्का पंकज भुजबळ (Tanishka Pankaj Bhujbal)यांनी सुवर्ण कामगिरी करत भारताला सुवर्णपदक (Goldmedal)मिळवून दिलंय. भारतासाठी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.

देविशा आणि तनिष्का या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमआयटी मुंबई या विद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. इंग्लडच्या मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे 13 ते 18 फेब्रुवारीमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत 38 देशातील 568 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

आमदार-खासदारांचे रेटकार्ड राऊतांनी केले जाहीर; म्हणाले, त्यांना विकत घेण्यासाठी..

या स्पर्धेत भारताचे 12 स्पर्धक विविध वयोगटात आणि वेगवेगळ्या धनुष्य प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेत देविशा पंकज भुजबळ हिनं 19 वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्का पंकज भुजबळ हिनं 17 वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात 1 सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलंय.

भारतीय संघ हा फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता. या स्पर्धेचं उद्घाटन मिडवे केंटच्या महापौर जेन अल्डोस आणि टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव मुरे यांच्या हस्ते पार पडले.

Tags

follow us