मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. बांगलादेशचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 227 धावांत गारद झाला. आता भारतीय संघाने खेळण्यास सुरुवात केली असून या सामन्यात ऋषभ पंतने दमदार अर्धशतक झळकावले आहे.
ऋषभ पंतने 48व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याचवेळी पुढच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. पंतने 49 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला आहे. त्याच्या खेळीमुळे भारताच्या धावसंख्येत मोठी वाढ झाली आहे.
श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी 55 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली आहे. दोन्ही फलंदाज आपापल्या शैलीत खेळत आहेत. भारताला अशा भक्कम भागीदारीची गरज होती कारण त्याचा टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.