Download App

Paris Olympics 2024: भारताच्या लेकीची कमाल ! विनेश फोगट फायनलमध्ये, पदकही पक्के

Paris Olympics 2024 final: फायनलमध्ये विजयी झाल्यास विनेश फोगट (Vinesh Phogat) सुवर्णपदकाला गवसणी घालेल. पराभूत झाल्यासही तिला रौप्यपदक मिळेल.

  • Written By: Last Updated:

Vinesh Phogat in Paris Olympics 2024 final: पॅरिस ऑलिम्पिकचा (Paris Olympics 2024) अकरा दिवस भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) जबरदस्त गाजविला. 50 किलो गटात तिने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेज पराभूत करत फायनल गाठली. फायनलमध्ये विजयी झाल्यास विनेश फोगट सुवर्णपदकाला गवसणी घालेल. पराभूत झाल्यासही तिला रौप्यपदक मिळणार आहे. त्यामुळे भारताचे आणखी एक पदके पक्के ठरले आहे.

Paris Olympics 2024 : दीपिका कुमारीने केली कमाल, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेजचा 5-0 ने पराभव करत एकतर्फी सामना जिंकला. 29 वर्षीय विनेश फोगट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. फायनलमध्ये विजयी झाल्यानंतर ते सुवर्णपदक जिंकेल. अशी कामिगरी करून ती पहिले सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. विनेश फोगट पहिल्यांचा 50 किलो गटात खेळली आहे. त्यापूर्वी ती 53 किलो गटात खेळत होती.

Paris Olympics : भारताच्या पोरीची जिद्द अपयशी; एका पॉईंटने मनु भाकरचं नेमबाजीत तिसरं पदक हुकलं


एकाच दिवसात तीन लढती गाजविल्या.

विनेश फोगटने मंगळवार गाजविला. एकाच दिवसात ती तीन सामने खेळली आहे. विनेश फोगटने (Vinesh Phogat) दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा (Oksana Livach) 7-5 ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत विनेश फोगटचा क्युबाच्या खेळाडूला पराभूत केले. तर उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटने दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन (Tokyo Olympic 2020) यु सुझुकीचा (Yui Susuki) पराभव केला आहे.

follow us