Download App

Paris Olympics : भारताच्या पोरीची जिद्द अपयशी; एका पॉईंटने मनु भाकरचं नेमबाजीत तिसरं पदक हुकलं

यापूर्वी पार पडलेल्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात तिने कांस्यपदक जिंकले आहे.

  • Written By: Last Updated:

Manu Bhaker Missed out Olympic Medal In Final Round : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनु भाकरचं महिला 25 मीटरच्या अंतिम फेरीत पदक मिळवण्याचं स्वप्न हुकलं आहे. यापूर्वी पार पडलेल्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात तिने कांस्यपदक जिंकले आहे. त्यानंतर आज 25 मीटर रायफल शुटिंगच्या अंतिम सामन्यात तिच्या विजयाकडे  सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, अवघ्या एका पॉइंटने मनु भाकरचं तिसरं पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं असून, ती चौथ्या स्थानावर राहिली.

पदकापासून एक पाऊल दूर 

अंतिम सामन्यात एकूण 10 शॉट्स मारले जाणार होते. एका  सीरिजमध्ये एकूण पाच शॉट्स होते तीन सीरिजनंतर एलिमिनेशन फेरी सुरू झाली. सात सीरिजनंतर मनू दुसऱ्या स्थानावर होती, पण यानंतर तिचे काही शॉट्स खराब लागले, त्यामुळे ती खालच्या स्थानावर गेली. तिने 8 सीरिजमध्ये एकूण 28 अचूक शॉट्स मारले.

10 मीटर एअर पिस्तुलमध्ये पहिले कांस्य 

भारतीय नेमबाज मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुण मिळवून कांस्यपदक जिंकले होते. तर, कोरियाच्या ओ ये जिनने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याने 243.2 गुण मिळवून ऑलिम्पिक विक्रम केला. कोरियाच्या किम येजीने रौप्यपदक जिंकले होते.

http://भारत-श्रीलंका सामना टाय तरीही सुपर ओव्हरच नाही; जाणून घ्या, नियम काय सांगतो..

सरबज्योत सिंगसोबत पदकही जिंकले 

मनू भाकरने सरबज्योत सिंगसह 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. दोघांनी हा सामना 16-10 अशा फरकाने जिंकला होता. मनू आणि सरबज्योत कोरियन संघाशी भिडला होता. कोरियाचा संघ पहिल्या सीरिजमध्ये पुढे गेला होता, पण मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी शानदार पुनरागमन करत कांस्य पदक जिंकले.

follow us