Prithvi Shaw Controversy : काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इंफ्ल्यूएंसर सपना गिलसोबत मारामारीचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळी गिलकडून शॉवर गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु, आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून शॉला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. गिलकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले आहे. यामुळे पोलिसांनी पृथ्वी शॉला एकप्रकारे क्लिनचीट मिळाली आहे.
NCP : CM शिंंदेंचा राष्ट्रवादीला दणका; भिवंडीत 18 बंडखोर नगरसेवक अपात्र
पोलिसांनी सोमवारी मुंबईच्या अंधेरी कोर्टात अहवाल सादर केला. ज्यात सपना गिलने क्रिकेटपटूवर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे. 15 फेब्रुवारीला सपना गिलने पृथ्वी शॉवर एका पबमध्ये तिचे शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापले होते. गिलच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी पृथ्वी शॉविरुद्ध एफआयआर न नोंदवल्याने तिने थेट अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. तिच्या वकिलांच्या विनंतीनंतर दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
एकाही साक्षीदाराने बघितले नाही
या सर्व प्रकरणात पोलिसांनी कोर्टात आहवाल सादर केला. ज्यात पोलिसांनीसांगितले की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एकाही साक्षीदाराने पृथ्वी शॉला सपना गिलचे शोषण करताना पाहिलेले नाही. तसेच साक्षीदारात एक सीआयएसएफ कर्मचारीही होता. ज्याने सपना गिल शॉसोबत गैरवर्तन करत असल्याचे म्हटले आहे.
सपना गिलने भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली पृथ्वी शॉविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यात शॉविरोधात कलम 354, कलम 509 आणि कलम 324 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. गिलच्या तक्रारीत पृथ्वी शॉशिवाय त्याचा मित्र आशिष यादव याचेही नाव होते. आशिष यादवने आपल्याला बॅटने मारल्याचा आरोप गिलने केला होता. मात्र, पोलिसांनी तक्रारी ऐकून घेतल्या नाहीत, तेव्हा सपना गिल यांनी न्यायालयात धाव घेतली होती.