Download App

आर. अश्विन बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज

  • Written By: Last Updated:

मुंबई : भारताचा (Team India) अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे. सध्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विन चमकदार कामगिरी करत असून त्याचाच फायदा त्याला झाला आहे.

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. एका डावात त्याने सहा विकेट्स घेण्याची कमालही केली. ज्यानंतर त्याने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर भारताच्या दमदार विजयात अश्विनचा मोठा वाटा होता. तर दुसरीकडे वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडकडून इंग्लंडच्या जबरदस्त पराभव झाल्यानंतर अँडरसन दुसऱ्या स्थानावर घसरला. 36 वर्षीय अश्विनने 2015 मध्ये सर्वात आधी आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याची कमाल केली होती.

गोगावलेंची जीभ काय घसरली अन् सारा खेळच पालटला; मविआ पुन्हा फॉर्मात..

अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या कमाल कामगिरी करताना दिसत आहे. अश्विनने दिल्लीमध्ये देखील भारताच्या विजयात महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या होत्या, पहिल्या डावाच्या एकाच षटकात मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथसारखे अव्वल दर्जाचे फलंदाज त्यानं तंबूत धाडले. अॅलेक्स कॅरीला तर शून्यावर बाद केलं होतं. दरम्यान सध्याही भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरु असून आणखी एक सामनाही शिल्लक आहे. या मायदेशातील मालिकेत आमखी चांगली कामगिरी करुन अश्विनला आपला क्रमांक 1 आणखी मजबूत करण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजाने 10 विकेट्स घेत अप्रतिम गोलंदाजी केली. ज्यामुळे तोही या क्रमवारीत आठव्या स्थानावर आला आहे. तसंच ICC कसोटी अष्टपैलू रँकिंगमध्ये जाडेजानं अव्वल स्थानावरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे. अश्विन त्याच्या मागे दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. इंग्लंडचा जो रुट हा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दोन स्थानांनी आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

Tags

follow us