ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचे वर्चस्व कायम, वैभव सूर्यवंशीकडे ऑरेंज तर रवी बिश्नोईंकडे पर्पल कॅप

फक्त पॉईंट्स टेबलचा नाही, तर ऑरेंज आणि परिपाक कॅपच्या शर्यतीत देखील राजस्थानचा दबदबा स्पष्टपणे दिसून येत आहे.

Untitled Design 69

Untitled Design 69

Rajasthan Royals continue to dominate : IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा जबरदस्त फॉर्म कायम असून, त्यांनी गुवाहाटीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सहज विजय मिळवत सलग चौथा विजय नोंदवला आहे. या विजयामुळे फक्त पॉईंट्स टेबलचा नाही, तर ऑरेंज आणि परिपाक कॅपच्या शर्यतीत देखील राजस्थानचा दबदबा स्पष्टपणे दिसून येत आहे. फलंदाजीत सध्या आघाडीवर असलेला युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी चार मॅचेसमध्ये 52, 31, 39 आणि 78 अशा धडाकेबाज खेळी करत 200 धावांसह टॉपवर आहे. त्याचा तब्बल 266.66 चा स्ट्राईक रेट आणि RCB विरुद्धच्या सामन्यात जोश हेजलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासारख्या गोलंदाजांवर केलेला आक्रमक मारा विशेष उल्लेखनीय ठरला, ज्यात त्याने 8 चौकार आणि 7 षटकार ठोकत 202 धावांचा पाठलाग सहजरित्या केला.

वैभव सूर्यवंशीचा सलामीचा जोडीदार यशस्वी जयस्वाल देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून, या सामन्यात फक्त 13 धाव केल्यामुळे तो दुसऱ्या नंबरवर घसरला असला तरी त्याच्या नावावर 183 धाव असून तो 17 धावांनी मागे आहे. राजस्थानचा आणखी एक युवा खेळाडू ध्रुव जुरेल तिसऱ्या नंबरवर असून त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 75 धावांनंतर या सामन्यात 43 चेंडूत नाबाद 81 धावा करत आपली चमक दाखवली आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सच्या समीर रिझवीच्या 160 धावा आणि कोलकाताच्या अंगक्रिश रघुवंशी 155 धावांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

अमेरिका-इराण चर्चेत पाच मोठे अडथळे; प्रादेशिक प्रभाव, आर्थिक अटी आणि सुरक्षा मुद्द्यांवरून तणाव कायम

गोलंदाजीत देखील राजस्थानचा दबदबा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. रवी बिष्णोई 9 विकेट्ससह पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 1/16, 4/41, 2/25 आणि 2/32 अशा प्रभावी कामगिरीसह त्याने संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. त्याच्या पाठोपाठ गुजरात टायटन्सचा प्रसिद्ध क्रिष्णा 6 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे, तर 5 विकेट्ससह अनेक गोलंदाज स्पर्धेत असून त्यात पंजाब किंग्सचा विनयकुमार, गुजरात टायटन्सचा राशीद खान, दिल्ली कॅपिटल्सचा लुंगी निगडी, लखनौ सुपरजईंट्सचा प्रिन्स यादव, आरसीबीचा जेकॉब डफी, केकेआरचा वैभव अरोरा, चेन्नई सुपर किंग्सचा अंशुल कंबोज तसेच राजस्थानचेच जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांचा समावेश आहे. एकूणच, IPL 2026 च्या सुरूवातीच्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात वर्चस्व गाजवत स्पर्धेवर मजबूत पकड निर्माण केली आहे.

Exit mobile version