Virat Kohlis Die Heart Fan Killed In Bengaluru Stampede : बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान काल (दि.4) संध्याकाळी जे काही घडले ते कधीही विसरता येणार नाही. चिन्नस्वामी स्टेडियमबाहेर घडलेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा अक्षरक्षः चिरडून मृत्यू झाला आहे. या अकारा जणांपैकी एक असलेल्या विराटच्या (Virat Kohli) अशाच एका चाहतीचाही यात दुदैंवी मृत्यू झाला आहे. विराटचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी या चाहतीने बॉसच्या हातापाया पडून सुट्टी मिळवली होती. पण तिला पुसटशी कल्पनाही नव्हती की तिचा सुट्टी मिळाल्याचा आनंद तिला आयुष्याच्या शेवटाकडे घेऊन निघाला आहे. देवी असे या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चाहतीचे नाव आहे.
आरसीबीच्या रॅलीत तब्बल ५ लाख माणसं; मात्र पोलिसांची सख्या फक्त 10 हजार, कशी घडली घटना?
सुट्टी मिळताच स्टेडियमकडे धावत सुटली अन्…
IPL च्या अंतिम सामन्यात विजय मिळविलेल्या RCB संघासाठी बंगळुरूमध्ये विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जाता यावे यासाठी देवीने तिच्या बॉस कसे-बसे मनवत सुट्टी मंजूर करून घेतली होती. त्यानंतर बॉसने देवीला काही तासांची सुट्टी मंजूरही केली. सुट्टी मंजूर झाल्याचा आनंद देवीला इतका झाला होता की ती तिचा लॅपटॉप तसाच सुरू ठेवून स्टेडियमकडे पळत सुटली. देवी विराट कोहलीची इतकी जबरस्त चाहती होती की तिने शहरात खेळल्या गेलेला एकही सामना कधीही चुकवला नव्हता.
तिकीट मिळाले नाही पण…
दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास देवीला तिच्या बॉसने कार्यक्रमासाठी काही तासांची सुट्टी मंजूर केली. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे तिकीट देवीला मिळाले नव्हते. परंतु, कार्यक्रमस्थळी गेल्यानंतर तिकिटाची काहीतरी सोय होईल अशी भाबडी आशा देवीला होती. ज्यावेळी देवी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास ऑफिसमधून बाहेर पडली, त्यावेळी तिने तिच्या मैत्रिणीला मेसेज केला की, ती स्टेडियममध्ये जाण्यासाठी मेट्रोने जात आहे. पण, ना देवीच्या मैत्रिणाला कल्पना होती नाही स्वतः देवीला की हा मेसेज आपला शेवटचा मेसेज ठरेल. त्यानंतर स्टेडियम बाहेर घडलेल्या चेंगराचेंगरीत देवीचा मृत्यू झाला.
अफवा उडाली, बॅरिगेट तुटले अन्… संभाजीनगरच्या तरुणाने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
देवीचा लॅपटॉप अजूनही टेबलावरच
विराटचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आनंदात बाहेर पडताना देवीने तिचा लॅपटॉप तसाच टेबलवर तसाच ठेवलेला असून, देवी आता पुन्हा परत कधीच येणार नाही यावर तिच्या सहकाऱ्यांचा अजूनही विश्वास बसत नसल्याचे देवीच्या मैत्रिणीने पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. देवीने बेंगळुरूला आल्यानंतर शहरात खेळला जाणारा एकही सामना चुकवला नव्हता. जेव्हा तिला कळले की, तिला विक्ट्री परेडसाठी स्टेडियममध्ये जाण्यासाठी तिकिटे मिळू शकतात, तेव्हा ती तिथे जाण्यासाठी उत्सुक होती झाली होती. तिला ही संधी सोडायची नव्हती. तिकीटासाठी तिने ऑनलाइन तपासणी केली होती. पण तिला तिकीट मिळाले नाही असेही देवीच्या मैत्रिणीने सांगितले.
जीवघेणा जल्लोष! आरसीबीच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची ‘पाच’ प्रमुख कारणे समोर; प्रशासन, सरकार अन्…
अफवा पसरली अन् गोंधळ झाला
ऑनलाईन तिकीट मिळालेले नसतानाही देवी कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाली होती. स्टेडियमजवळ गेल्यानंतर तिकिटाची काहीतरी सोय होईल अशी भाबडी आशा तिला होती. ज्यावेळी चाहते स्टेडियमजवळ जमले होते. त्यावेळी मोफत तिकिटे मिळण्याची अफवा पसरली आणि त्याचवेळी गेट क्रमांक ७ बाहेर चेंगराचेंगरी झाली. लाखोंच्या गर्दीत अडकलेले लोकं एकमेकांवर कोसळले. यात काहींचा गुदमरून मृत्यू झाला तर, अनेक जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीची देवीदेखील बळी ठरली ती पुन्हा परत कधीच न येण्यासाठी.