Download App

RCBच्या पराभवानंतर नवीन-उल-हकने डिवचले; सोशल मीडियावर भिडले विराटचे चाहते

Virat Kohali Vs Navin Ul Haq :  सध्या सुरु असलेल्या आयपीएल हंगामात आरसीबीचा गुजरात टायटन्सने पराभव केल्याने त्यांचे यावर्षीचे आयपीएलमधील आव्हान संपूष्टात आले आहे. या परभवामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळणाऱ्या नवीन-उल-हक याने प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीला ट्रोल केले. याआधी विराट कोहली आणि नवीन-उल-हक आरसीबी विरुद्ध लखनौ सामन्यादरम्यान आमनेसामने आले होते आणि त्याच सामन्यात विराट आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला होता, त्यानंतर बीसीसीआयने तिघांना फटकारले आणि दंड ठोठावला.

गुजरातविरुद्ध आरसीबीच्या पराभवानंतर, नवीन-उल-हकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यानंतर तो चाहत्यांच्या रडावर आला.

कोलकात्याच्या संघाला पराभूत करुन लखनौचा संघ प्लेऑफ पर्यंत पोहोचला आहे. या सीजनमध्ये लखनौच्या फास्ट बॉलर्सबरोबर विराट कोहलीच्या अनेकदा खटके उडाले. दरम्यान, 21 मे रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सकडून 6 विकेटने पराभूत झाल्यानंतर RCB 14 गुणांवर राहिली, तर मुंबई इंडियन्सने पहिल्या दिवशी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून शेवटचे उर्वरित आयपीएल प्लेऑफ स्थान मिळविले.

follow us