Download App

फायनलसाठी रोहित शर्माचा गेम प्लान तयार, प्लेईंग-11 कशी असेल?

IND vs AUS World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वर्ल्डकपचा महामुकाबला (World Cup Final) उद्या होणार आहे. दोन्ही संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. या स्पर्धेतील एकमेव अजय संघ असलेल्या भारताने अद्याप चूक केलेली नाही, तर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या सुरुवातीला सलग पराभव स्वीकारल्यानंतर मागे वळून पाहिलेले नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

रोहित शर्मा अंतिम सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत उद्या होणाऱ्या फायनलबद्दल भाष्य केलं. रोहित म्हणाला की, भारतीय संघाने या दिवसासाठी खूप तयारी केली होती. खेळाडूंच्या निवडीबाबत रोहित म्हणाला की, गेल्या अडीच वर्षांपासून संघात कोण फिट बसेल यासाठी खेळाडूंना टेस्ट केले जात होते. प्रत्येकाची जबाबदारी स्पष्ट असल्याने आम्हाला खूप फायदा झाला आहे.

World Cup 2023 फायनल म्हणजे अभूतपूर्व सोहळा ! हवाई दलाचे चित्तथरारक प्रात्याक्षिके ते…

अंतिम फेरीतही चांगली कामगिरी करू
रोहित म्हणाला, “आम्ही या दिवसासाठी खूप दिवसांपासून तयारी केली होती. आम्ही T20 विश्वचषक आणि WTC फायनलही खेळलो. आम्हाला तिन्ही फॉरमॅटमध्ये योग्य खेळाडूंची निवड करायची होती. आम्ही गेल्या अडीच वर्षांपासून हे करत आहोत. आम्ही सर्वांची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे आम्हाला खूप मदत झाली आहे आणि आशा आहे की आम्ही अंतिम फेरीतही चांगली कामगिरी करू.”

खेळपट्टी कसे असेल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या खेळपट्टीवर गवत नव्हते. पण फायनलसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर थोड्याफार प्रमाणात गवत आहे. मी अद्याप खेळपट्टी पाहिलेली नाही. पण खेळपट्टी संथ असण्याची शक्यता आहे. उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर सर्व निर्णय घेतले जातील. खेळाडूंना याबाबत कल्पना आहे, असे रोहित शर्माने सांगितले.

IND vs AUS Final : फायनल सामना बरोबरीत राहिला तर विनर कोण? ICC ने आणला नवा नियम

15 खेळाडू सामन्यासाठी तयार
रोहित शर्मा म्हणाला, सर्व 15 खेळाडूंकडे खेळण्याची संधी आहे. आज आणि उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर 12-13 खेळाडू निवडले जातील. पण प्लेईंग 11 अद्याप तयार नाही. सर्व 15 खेळाडू सामन्यासाठी तयार आहेत.

Tags

follow us