SAFF Championship Final: सैफ चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कुवेतचा पराभव करत भारत 9 व्यांदा चॅम्पियन बनला आहे. या सामन्यात सुनील छेत्रीच्या संघाने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते, त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. मात्र अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघाच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. मात्र, भारताने 9 व्यांदा सैफ चॅम्पियनशिप जिंकली आहे.
या सामन्यातील पहिला गोल कुवेतचा खेळाडू अल्काल्डीने केला. सामन्याच्या 16व्या मिनिटाला कुवेतने 1-0 अशी आघाडी घेतली. त्याचवेळी, यानंतर भारतीय संघाला 17व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली, पण ती हुकली. मात्र, भारतासाठी कर्णधार सुनील छेत्रीने 39व्या मिनिटाला गोल केला. अशा प्रकारे भारतीय संघाने बरोबरी साधली. यानंतर दोन्ही संघ 1-1 असा बरोबरीत आले.
Ajit Agarkar; मराठमोळा अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष, बीसीसीआयची घोषणा
भारत आणि कुवेत यांच्यातील अंतिम सामना निर्धारित वेळेपर्यंत 1-1 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. मात्र अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांचे खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटने सामन्याचा निकाल लागला. भारतीय संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा 5-4 असा पराभव केला. अशाप्रकारे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विक्रमी 9व्यांदा सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.