Download App

Sania Mirza : सानिया मिर्झा सुरु करणार क्रिकेटमध्ये नवी इनिंग

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ( Saniy Mirza ) ही आता नवीन भूमिका पार पाडताना दिसणार आहे.  ती आगामी रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ( RCB )  या महिला प्रीमियर लीगच्या संघाची मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे. याबाबत रॉयल चॅलेंजर्सच्या संघाकडून अधिकृतपणे ट्विटर हँडेलवर सांगण्यात आले आहे.

सानिया मिर्झाने आत्तापर्यंत आपल्या करिअरमध्ये 6 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. सानियाने आपल्या कारकिर्दीतील शेवटची टूर्नामेंट 2023 ची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळली होती. यावेळी ती रोहन बोपन्ना सोबत मिश्रित प्रकारमध्ये खेळली होती व यात ती रनर्स- अप राहिली होती.

दरम्यान आरसीबीच्या संघाने याबाबत अधिकृतपणे ट्विट केले आहे. आमच्या महिला क्रिकेटर्सना दबावामध्ये कसे खेळायचे, याबाबतच्या मार्गदर्शनासाठी आम्ही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा विचार करु शकत नाही. आमच्या महिला संघाची मेंटॉर म्हणून एक चँपियन अॅथलीट सानिया मिर्झा असणार आहे, असे आरसीबीने म्हटले आहे.

यावर सानिया मिर्झाने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आरसीबीच्या महिला संघासोबत एक मेंटॉर म्हणून आल्याने मी आनंदात आहे. भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये महिला प्रीमियर लीगमुळे आमुलाग्र बदल पहायला मिळेल. या क्रांतिकारी घटनेची साक्षीदार मी होणार आहे. आरसीबी व त्यांच्या ब्रँडचा विचार हा माझ्या विचारांशी मिळता-जुळता आहे, अशी भावना सानियाने व्यक्त केली आहे.

Tags

follow us