Shubman Gill : इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडले आहे. यशस्वी जयस्वालनंतर भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) शतक झळकावले आहे. गिलने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे. गिलने 13 चौकारांसह 140 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या.
शुभमन गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. शुभमन गिलने भारतासाठी 32 सामन्यांमध्ये 36.96 च्या सरासरीने 1990 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्धचे हे तिसरे शतक आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्धही शतके झळकावली आहेत. कर्णधार शुभमन गिलने यशस्व जयस्वालसोबत तिसऱ्या विकेटसाठी 164 चेंडूत 129 धावांची भागीदारी केली. 101 धावा केल्यानंतर यशस्वी बाद झाला.
HUNDRED from the Skipper! 💯
First match as Test Captain and Shubman Gill has scored a sublime century! 👏👏
His 6th Ton in Test cricket 🙌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/CVTE7wK2g0
— BCCI (@BCCI) June 20, 2025
या शतकासह शुभमन गिल हा कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक करणारा चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी विजय हजारे, सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे.
WhatsApp वर करता येणार डॉक्युमेंट स्कॅन आणि शेअर; थर्ड पार्टी App ची गरज