भारताच्या चंद्र विजयानंतर मुंबई इंडियन्सचं खास ट्विट; ‘वर्ल्डकप’साठी जोडलं 2019 चं कनेक्शन!

Mumbai Indians : भारताचे चांद्रयानाने काल यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग (Chandrayaan 3) केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. या यशाचे जगभरातून कौतुक होत असतानाच आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक खास ट्विट केलं आहे. ज्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सन 2019 मध्ये भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली नव्हती. […]

Rohit Sharma

Rohit Sharma Isro

Mumbai Indians : भारताचे चांद्रयानाने काल यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग (Chandrayaan 3) केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. या यशाचे जगभरातून कौतुक होत असतानाच आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक खास ट्विट केलं आहे. ज्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

सन 2019 मध्ये भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली नव्हती. विक्रम लँडरचे (Vikram Lander) क्रॅश लँडिंग झाल्याने ही मोहिम अयशस्वी ठरली होती. त्याचवर्षी झालेल्या वर्ल्डकप मध्ये टीम इंडिया विजयी होऊ शकलेली नव्हती. आता मात्र बरोबर 2023 मध्ये भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरली आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने याच वर्षात होणारा वर्ल्डकप जिंकावा अशी अपेक्षा भारतीय व्यक्त करत आहेत. हेच कनेक्शन जोडत मुंबई इंडियन्सने हे ट्विट केले आहे.

मुंबई इंडियन्सच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आताही टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच आहे. 2019 च्या विश्वचषकातही त्याच्याच हाती कमान होती. आता ही संधी पुन्हा चालून आली आहे. मागील चुकांमधून धडा घेत योग्य नियोजन करून ज्या पद्धतीने इस्त्रोने आपली मोहिम फत्ते केली त्याच पद्धतीने आगामी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने कामगिरी करावी अशी भावना क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.

दरम्यान, भारताच्या या दैदिप्यमान यशाचे जगभरातून कौतुक केले जात आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी भारताच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. चंद्रावर चांद्रयान 3 चे लँडिंग हा ISRO साठी खूप मोठा क्षण आहे. इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांच्यासह अनेक तरुण वैज्ञानिक हा क्षण साजरा करताना मी पाहतो आहे. स्वप्ने असलेली तरुण पिढीच जग बदलू शकते… शुभेच्छा.

Chandrayaan-3 च्या यशाबद्दल जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पाकिस्ताननेही केलंही भारताचं अभिनंदन

युरोपियन स्पेस एजन्सीने काय म्हटले?

युरोपियन स्पेस एजन्सीने भारताच्या यशावर लिहिले की चांद्रयान टीम आणि इस्रोचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. अंतराळ संस्थेने हात जोडून इमोजी शेअर करून भारताच्या यशाला सलाम केला आहे. दुसरीकडे, युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक जोसेफ एशर म्हणाले की, क्रेडिबल, इस्रो, चांद्रयान-3 आणि भारतातील लोकांचे खूप खूप अभिनंदन.

Exit mobile version