Download App

“माझ्या मुलाने तिरंगा फडकावत ठेवला” स्वप्निलच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना

मला खात्री होती की गेल्या स्वप्निलची तपस्या तो कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया स्वप्निल कुसाळेच्या वडिलांनी दिली.

Swapnil Kusale : महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसाळेने ऑलिम्पिक (Swapnil Kusale) स्पर्धेत शानदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. देशासह महाराष्ट्राचाही मान वाढविण्याचं (Paris Olympics) काम स्वप्निलने केलं. त्याच्या या यशाचा आनंद देशात साजरा होतोय. कोल्हापुरातही नागरिक (Kolhapur News) आणि स्वप्निलच्या कुटुंबियांनी जल्लोष साजरा केला. मला खात्री होती की गेल्या स्वप्निलची गेल्या बारा तेरा वर्षांची तपस्या तो कधीच विसरणार नाही. आपला तिरंगा तो कधीच खाली पडू देणार नाही याची खात्री मला होती. तो तिसरा आला तरी चालेल पण त्याने आपल्या देशाचा तिरंगा फडकावत ठेवला याचा मला अभिमान वाटतो, अशा भावना त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या.

Paris Olympics 2024 : कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं बाजी मारली! स्वप्नील कुसळेची कांस्य पदकाला गवसणी 

नेमबाज स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नील कुसळेचा हा विजय ऐतिहासिक आहे कारण या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. कोल्हापूरच्या या २९ वर्षीय नेमबाजाचे हे पहिलेच ऑलिम्पिक (Paris Olympics ) आहे. या खेळाडूने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. हा खेळाडू 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि पॅरिसमध्ये त्याला संधी मिळाल्यावर त्याने इतिहास रचला.

माझ्या मुलाने देशाचा तिरंगा फडकावत ठेवला याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया स्वप्निलच्या वडिलांनी दिली. माझ्या भावाने देशासाठी कांस्यपदक जिंकलं याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया स्वप्निलच्या भावाने दिली. स्वप्निलच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे मॅडम यांना तो आईसमान मानतो. तो खूप भावनिक आहे. भावनिक मुलं कधी कुठेच कमी पडत नाहीत असे स्वप्निलचे वडील म्हणाले.

Paris Olympics : मनू भाकरने रचला इतिहास! सरबज्योतसह जिंकलं दुसरं कांस्यपदक

कुसाळे याने एकूण 451.4 गुणांसह लक्ष्य पूर्ण केले आणि त्याला वाय.के.ला मागे टाकले. लिऊ आणि सेरहिय कुलिश अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. कुसळेची कामगिरी लिऊच्या 463.6 आणि कुलिशच्या 461.3 च्या तुलनेत काहीशी कमी होती. शेवटच्या क्षणापर्यंत तो रौप्यपदकासाठी स्पर्धेत होता पण शेवटी त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागलं.

स्थिती सुधारली

स्वप्नील कुसळेने डावाची संथ सुरुवात केली. त्याने १५३.३ (पहिली सीरीज- ५०.८, दुसरी सीरीज ५०.९, तिसरी सीरीज- ५१.६) स्कोअर केला. तो सहाव्या क्रमांकावर राहिला. यानंतर, त्याने प्रोनमध्ये (पहिली सीरीज- ५२.७, दुसरी सीरीज- ५२.३, तिसरी सीरीज- ५१.९) १५६.८ गुण मिळवून आपली स्थिती सुधारली. प्रोननंतर तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. येथून त्याला चमत्कार करण्याची गरज होती.

follow us