Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवाला मोठा धक्का; टी20 कर्णधारपदावरुन काढलं?

Suryakumar Yadav : भारतीय टी20 संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवाला बीसीसीआयने मोठा धक्का दिला असून त्याच्याकडून टी20 संघाचे कर्णधार

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav : भारतीय टी20 संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवाला बीसीसीआयने मोठा धक्का दिला असून त्याच्याकडून टी20 संघाचे कर्णधार पद काढून घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर त्याची भारतीय टी20 संघातून सुट्टी करण्यात आली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. द इंडियन एक्सप्रेस याबाबत माहिती दिली आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आता टी20 क्रिकेटमध्ये एका नवीन कर्णधाराचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, नवीन टी20 कर्णधाराची घोषणा लवकरच केली जाण्याची अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेस ला सांगितले, प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याशी चर्चा केल्यानंतर, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने टीम इंडियाला (T20 क्रिकेटमध्ये) एका नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले, जरी सूर्याच्या (Suryakumar Yadav) कर्णधारपदाखाली संघाने टी 20विश्वचषक जिंकला असला, तरी त्याचा वैयक्तिक फॉर्म आणि भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन, आता पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे संघ निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही आणि या निर्णयाबाबत त्याला लवकरच कळवले जाईल.

शेतकऱ्यांना दिलास; कर्ज माफीचा शासन निर्णय जारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

2021, 2022 आणि 2023 या त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळांनंतर, सूर्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण दिसून आली.  2026 मध्ये, सूर्यकुमार यादवने 14 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 44 च्या सरासरीने 484 धावा केल्या. दरम्यान, 2026 च्या आयपीएलमधील त्याची कामगिरीही काही विशेष नव्हती. 13 डावांमध्ये त्याला केवळ 270 धावा करता आल्या आणि त्याने फक्त एकच अर्धशतक नोंदवले. त्याची फलंदाजीची सरासरी केवळ 20.76 इतकी होती.

Exit mobile version