T 20 World Cup Final : नवा इतिहास रचला ! न्यूझीलंडला सहज हरवत भारत तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’

T 20 World Cup Final- सलामीवीर संजू सॅमसनने 89 , इशान किशनने 54 आणि अभिषेक शर्माने 52 धावांची स्फोटक खेळी केली.

India Beat Newzeland World Cup

India Beat Newzeland World Cup

India vs New Zealand : टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी दारूण पराभव करत विश्वविजेतेपद पटकाविले. याचबरोबर भारताने एक इतिहास रचला आहे. घरच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत टी-20 वर्ल्डकप जिंकणारा, तिसऱ्यांदा वर्ल्डकप आणि सलग दोन वर्ल्डकप जिंकणारा भारत पहिला संघ ठरलाय.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडने जोरदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्या षटकात अक्षर पटेलने फिन एलनला नऊ धावांवर झेलबाद करत न्यूझीलंडला पहिला झटका दिलाय. रचिन रविंद्रला जसप्रीत बुमराहने एका धावेवर बाद केले. न्यूझीलंडचे दोन फलंदाज 32 धावांत बाद झाले. अक्षर पटेलने ग्लेन फिलिप्सचा त्रिफळा उडविला. त्यामुळे पाच षटकांत न्यूझीलंडच्या तीन बाद 47 धावा अशी अवस्था झालीय. मार्क चॅपमॅन हार्दिक पंड्याने अवघ्या तीन धावांवर बाद केले. टिम सेफर्ट अर्धशतक झळकवून बाद झाल्याने न्यूझीलंडची अवस्था बिकट झाली. अर्धासंघ केवळ 72 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर मिचेल सॅंटनर आणि डिरेल मिचेलने सहाव्या विकेट्ससाठी भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघेही बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव झाला. न्यूझीलंडचा संघ 159 धावांत गारद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार आणि अक्षर पटेलने तीन विकेट्स घेतल्या.

संजू, इशान किशन, अभिषेक शर्माचे अर्धशतके
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी अहमदाबादच्या मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पाडत न्यूझीलंडसमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवलंय. सलामीवीर संजू सॅमसनने 89 , इशान किशनने 54 आणि अभिषेक शर्माने 52 धावांची स्फोटक खेळी केली. न्यूझीलंडकडून जिमी निशमने तीन विकेट घेतल्या. सलामीवीर अभिषेक शर्मा व संजू सॅमसनने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढत चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे सहा षटकांत 92 धावा झाल्या. अभिषेक शर्माने अवघ्या 18 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकविले. अभिषेकने 21 चेंडूत 52 धावा काढल्या. त्यात 6 चौकार आणी तीन षटकारांचा समावेश आहे.

संजू सॅमसनची 89 धावांची स्फोटक खेळी
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आलेल्या इशान किशनने संजू सॅमसनला साथ देत जोरदार फटकेबाजी केली. इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे. संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची स्फोटक खेली केली. त्यात आठ षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे. तो मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. तिघांच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने 16 व्या षटकात 200 धावांचा टप्पा ओलांडला. पण फटकेबाजी करताना इशान किशन 54 धावांवर बाद झाला. त्याने 25 चेंडू चार चौकार आणि चार षटकार मारले.

जिमी निशमने धक्के दिले पण दुबेने फोडून काढलं
त्यानंतर सूर्यकुमार यादवही खाते न उघडताच झेलबाद झाला. जिमी निशमने 16 व्या षटकात संजू, इशान, सूर्यकुमार यादवला झेलबाद करत तीन झटके दिले. त्यामुळे धावगतीला ब्रेक लागला.पण शिवम दुबेने जिमी निशमचे शेवटचे षटक फोडून काढलं. शिमने आठ चेंडूत 26 धावा कुटल्या. त्यात त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version