India VS New Zealand: टी-20 वर्ल्डकपच्या (T 20 World Cup Final) फायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी अहमदाबादच्या मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पाडत न्यूझीलंडसमोर 255 धावांचा डोंगर उभा केलाय. सलामीवीर संजू सॅमसनने 89 , इशान किशनने 54 आणि अभिषेक शर्माने 52 धावांची स्फोटक खेळी केली. न्यूझीलंडकडून जिमी निशमने तीन विकेट घेतल्या. पण अखेरच्या षटकात त्याची धुलाई झाली. वर्ल्डकपच्या इतिहासात फायनलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने स्फोटक सुरुवात केली. आतापर्यंत अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्मा व संजू सॅमसनने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढत चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे सहा षटकांत 92 धावा झाल्या. अभिषेक शर्माने अवघ्या 18 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकविले. अभिषेकने 21 चेंडूत 52 धावा काढल्या. त्यात 6 चौकार आणी तीन षटकारांचा समावेश आहे. सलामीच्या जोडीने 98 धावांची भक्कम भागिदारी केली.
संजू सॅमसनची 89 धावांची स्फोटक खेळी
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आलेल्या इशान किशनने संजू सॅमसनला साथ देत जोरदार फटकेबाजी केली. इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे. संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची स्फोटक खेली केली. त्यात आठ षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे. तो मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. तिघांच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने 16 व्या षटकात 200 धावांचा टप्पा ओलांडला. पण फटकेबाजी करताना इशान किशन 54 धावांवर बाद झाला. त्याने 25 चेंडू चार चौकार आणि चार षटकार मारले.
𝗥𝗘𝗖𝗢𝗥𝗗-𝗕𝗥𝗘𝗔𝗞𝗜𝗡𝗚 𝗦𝗧𝗔𝗡𝗗 👏
This is also the first 5️⃣0️⃣-plus opening stand in an ICC Men’s #T20WorldCup #Final 🔥
Sanju Samson 🤝 Abhishek Sharma
Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#TeamIndia | #MenInBlue | #INDvNZ | @IamSanjuSamson | @OfficialAbhi04 pic.twitter.com/CgO0aIMsKW
— BCCI (@BCCI) March 8, 2026
जिमी निशमने धक्के दिले पण दुबेने फोडून काढलं.
त्यानंतर सूर्यकुमार यादवही खाते न उघडताच झेलबाद झाला. जिमी निशमने 16 व्या षटकात संजू, इशान, सूर्यकुमार यादवला झेलबाद करत तीन झटके दिले. त्यामुळे धावगतीला ब्रेक लागला.पण शिवम दुबेने जिमी निशमचे शेवटचे षटक फोडून काढलं. शिमने आठ चेंडूत 26 धावा कुटल्या. त्यात त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
