T20 World Cup 2024 : यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) 36वा सामना पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड (16 जून) रोजी लॉडरहिल, फ्लोरिडा, सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड येथे खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघानं बाजी मारली आहे. आयर्लंडनं दिलेल्या 107 धावांचं आव्हान पाकिस्ताननं 18.5 षटकात पूर्ण केलं. यंदाच्या टी20 विश्वचषकातील पाकिस्ताननं हा दुसरा विजय मिळवलाय.
दुसरा विजय T20 World Cup : विंडीजचा पहिला विजय! नवख्या पापुआ न्यू गिनी संघावर मात
पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझमनं 34 चेंडूत सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्यानं 2 चौकार लगावले. तर सलामीवीर मोहम्मद रिझवान, सॅम अयूब, अब्बास आफ्रिदी यांनी 17 धावांची खेळी केली आणि शाहीन आफ्रीदीनं 19व्या ओव्हरमधल्या 5व्या चेंडूवर षटकार ठोकून पाकिस्तानला दुसरा विजय मिळवून दिला. आयर्लंडसाठी बॅरी मॅककार्थी 3, कर्टिस कॅम्फर 2, बेंजामिन व्हाइट आणि मार्क एडेअर यांनी 1-1 विकेट घेतली.
इमाद वसीमनं 3 विकेट्स
दरम्यान, पाकिस्ताननं टाॅस जिंकून आयर्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 106 धावा केल्या. आयर्लंडसाठी गॅरेथ डेलेनी सर्वाधिक 19 चेंडूत 31 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 3 उत्तुंग षटकार लगावले. मार्क एडेअर 15 तर जॉर्ज डॉकरेलनं 11 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी आणि इमाद वसीमनं 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद अमिर 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिला तर हारिस रौफनं 1 विकेट्स घेतली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 पुढील 48 तास या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सॅम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद अमीर, अब्बास आफ्रिदी
आयर्लंड- पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट