Ind vs Zim : टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 मध्ये आज भारतीय संघ आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चेन्नईच्या मैदानात आज भारतीय संघ झिम्बाब्वेशी भिडणार आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारतीय संघाला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवावाच लागणार आहे. सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर आज भारतासाठी महत्त्वाचा सामना असणार आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला या सामन्यात झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे.
High intensity and focus 🔛 💪#TeamIndia putting in the work ahead of #INDvZIM 🙌#T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/zjOtB9m7jS
— BCCI (@BCCI) February 25, 2026
सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारतासाठी समीकरण काय?
भारतीय संघाला टी20 विश्वचषक 2026 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर या सामन्यात भारताला झिम्बाब्वेला (Ind vs Zim) मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) 76 धावांच्या पराभवामुळे भारताच्या नेट रन रेटवर मोठा परिणाम झाला आहे. भारताचा नेट रन रेट सध्या -3,800 आहे. जर भारताला त्यांचा नेट रन रेट पॉझिटिव्ह झोनमध्ये आणायचा असेल तर त्यांना झिम्बाब्वेला (Zimbabwe) किमान 77 धावांनी पराभूत करावे लागेल.
The Chevrons are dialing in their skills for a must-win clash 🤜🤛#T20WorldCup broadcast details 👉 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/Rd0bNZu82s
— ICC (@ICC) February 25, 2026
जर भारताने झिम्बाब्वेविरुद्ध धावांचा पाठलाग केला तर-
101 धावा – 7.1 षटकांत धावांचा पाठलाग करायचा आहे
121 – 8.1 षटकांत धावांचा पाठलाग करायचा आहे
141 – 10 षटकांत धावांचा पाठलाग करायचा आहे
161 – 11.3 षटकांत धावांचा पाठलाग करायचा आहे
181 – 12.5 षटकांत धावांचा पाठलाग करायचा आहे
कन्या राशीसह ‘या’ राशींच्या लोकांना आज होणार मोठा फायदा; निर्माण होणार उत्पन्नाचे नवीन स्रोत
